चंद्रकांत पाटील म्हणाले , राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ?

 

  

चंद्रकांत पाटील म्हणाले , राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ?संजय राऊतांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा माणूस काय बोलणार ?


पुणे - राष्ट्रवादीच्या आणि नेत्या खासदार सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का? असा सवाल  भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील  यांनी विचारला आहे. संजय राऊतांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा माणूस काय बोलणार ? असा चिमटाही  त्यांनी यावेळी काढला. 


राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेते विरुद्ध भाजपा नेते असा राजकीय आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा राज्यात सुरू आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी इंदापुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याविषयी बोलताना ‘ ते राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करण्यासाठी पुण्याला येत आहेत’ असे विधान केले होते. त्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘त्या स्वप्नात आहेत का’ असा उपरोधिक टोला  लगावला आहे.  संजय राऊत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले,”संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार?,” असा टोला त्यांनी लगावला.


समता दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी भिडेवाडा या ठिकाणी जाऊन महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, महात्मा फुले, आयुष्यभर महिला आणि शेतकऱ्यांसाठी झटत राहिले. पण अजूनही महिला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळताना दिसत नाही. वर्षभरात शेतकरी प्रचंड संकटात आहे. अतिवृष्टी झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही.

From Around the web