मागण्यांची पूर्तता करा अन्यथा इच्छा मरण्याच्या अर्जाला परवानगी द्या....

 
  वीज कंत्राटी कामगार कृती समिती

 मागण्यांची पूर्तता करा अन्यथा इच्छा मरण्याच्या अर्जाला परवानगी द्या....


पुणे - अनेक वर्षे प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा अन्यथा कामगारांनी केलेल्या इच्छा मरण्याच्या अर्जाला मुख्यमंत्र्यानी रीतसर परवानगी द्यावी अशी मागणी वीज कंत्राटी कामगार कृती समितीने केली आहे.

कंत्राटी वीज कामगारांचे प्रलंबित मागण्यांना करीता गेली अनेक वर्षे आंदोलन करत आहे गेल्या वेळी सुरू केलेल आंदोलन ऊर्जा मंत्र्यांच्या चर्चे नंतर मागे घेण्यात आल मात्र पुन्हा शासनाने चर्चेस न बोलावल्याने पुन्हा एकदा सात सप्टेंबर पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा वीज कंत्राटी कामगार कृती समिती चे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

यावेळी सचीन मेंगाळे उपस्थित होते महावितरण मध्ये भरती करा पण कंत्राटी कामगार घरी जाणार नाही याची लिखित खात्री ऊर्जा मंत्रांनी द्यावी,कंत्राटी कामगारांनी जेवढी वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम केलं तेवढी वर्षे त्यांना भरती दरम्यान वयात सवलत मिळावी,त्यांना भरतीमध्ये पन्नास टक्के विशेष बाब म्हणून आरक्षण देऊन सामावून घ्यावे,शासनाच्या इतर खात्यात चतुर्थश्रेणीसाठी जी वयोमर्यादा लागू आहे तीच वयोमर्यादा वीज उद्योगात ठेवावी,महावितरण ची विद्युत सहाय्यक ही भरती एसीसी च्या मार्क मेरिट नुसार न लावता वीज उद्योगाशी संबंधित व्यवसायिक शिक्षण असलेल्या आयटीआय विजतंत्रि तारतंत्री च्या मेरिट नुसार करावी,कंत्राटी कामगार पद्धत कायमच बंद करावी आणि वीज कंत्राटी कामगारांना शास्वत रोजगार द्यावा यामुळे वीज कंपनीचे 25 टक्के रुपये वाचून अब्जावधी रुपयांचा फायदा होईल असा दावा यावेळी खरात यांनी केला आहे.

या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी सात सप्टेंबर पासून कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू करणार आहेत अशी माहितीही निलेश खरात यांनी दिली आहे

From Around the web