शेतकरी आंदोलनाला वारज्यात मोठा पाठिंबा

 


वारजे महामार्ग पुलाखाली महाविकास आघाडीची  जोरदार निदर्शने 


 शेतकरी आंदोलनाला वारज्यात मोठा पाठिंबा


पुणे : केंद्र सरकारने केलेली शेतीविषयक जाचक विधेयके मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून वारजे महामार्ग उड्डाणपुलाखाली महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. वारजे भागातील  पक्षीय,समविचारी संघटना यांनी सकाळी साडेदहा वाजता निदर्शन आंदोलन केले. 


 राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल पुणे उपाध्यक्ष  जावेद शेख, सौ प्राची दुधाणे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन बराटे व शिवसेना  वारजे अध्यक्ष अजय पोळ यांनी संयोजन  केले. आंदोलनात विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते  दिलीप बराटे, जिल्हा परिषद सदस्य सौ इंगळे, नगरसेवक सचिन दोडके,जावेद शेख  श्रीकृष्ण बराटे, बाबा खान,एड विठ्ठल वांजळे,सौ प्राची दुधाणे  या सर्वानी मत प्रदर्शन केले व निषेध आंदोलनाला मार्गदर्शन केले. सौ सायली वांजळे यांनी आभार मानले .  जावेद शेख व देवेंद्र सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.


या आंदोलनात पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकार हाय हाय, ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोकी वरती पाय, वापस लो,  वापस लो, काला कानून वापस लो अशा  घोषणाबाजीने आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पुण्यात "किसान बाग" सुरु करण्याची माहीती जावेद  शेख यानी दिली आणी शेवटी राष्ट्र गीताने सांगता करण्यात आली.  

From Around the web