पाच हजाराची लाच घेताना एक पोलीस हवालदार आणि वकील जाळ्यात 

सोलापूर जिल्ह्यात उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 
 
पाच हजाराची लाच घेताना एक पोलीस हवालदार आणि वकील जाळ्यात

सोलापूर - तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्याकरिता पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एक पोलीस हवालदार आणि वकीलावर वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही  कारवाई उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. 

तक्रारदार  आणि त्यांच्या वडिलांवर कलम 324 भा. द. वि. प्रमाणे पोलीस स्टेशन वेळापूर, ता. माळशीरस, ज़िल्हा सोलापूर येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास लोकसेवक भागवत पांडुरंग झोळ, पोलीस हवालदार ब. नं. 354, पोलीस ठाणे वेळापूर,  ता. माळशीरस, ज़िल्हा उस्मानाबाद यांचेकडे होता दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी लोकसेवक भागवत झोळ यांनी दिनांक 12.05.2021 रोजी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाचेची मागणी करून दिनांक 13.05.2021 रोजी 5000 रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारले तसेच तक्रारदार यांचे वकील  चंद्रकांत महादेव रिसवडकर, रा. सुजय नगर,  अकलूज, ता. माळशीरस, ज़िल्हा सोलापूर यांनी  गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याने याबाबत  पो स्टे वेळापूर, ज़िल्हा सोलापूर येथे गु. र. नं 106/2021 कलम 7,12 भ्रस्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 

ही कार्यवाही  राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. विभाग पुणे चार्ज औरंगाबाद, मा. मारुती पंडित.अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. विभाग औरंगाबाद,  प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक,  ला. प्र. विभाग, उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे  , पोलीस निरीक्षक,  ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, विष्णू बेळे, विशाल डोके,  सिद्धेश्वर तावस्कर, चालक दत्तात्रय करडे ला. प्र. वि. उस्मानाबाद  यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.

From Around the web