प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एनएफएसए लाभार्थ्यांना अतिरिक्त मोफत धान्याचे वाटप 

 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एनएफएसए लाभार्थ्यांना अतिरिक्त मोफत धान्याचे वाटप

मुंबई  - देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 2 महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (एनएफएसए) अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना दरमहा माणसी 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएम -जीकेवाय)” च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे.

ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाचे  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, “पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने मे आणि जूनसाठी 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना 5 किलो मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. मोदी सरकार या कठीण काळात समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्यास वचनबद्ध आहे”

या विशेष योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य गृहकर्मी (पीएचएच) या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना, एनएफएसए च्या दरमहा नियमित मिळणाऱ्या धान्या व्यक्तिरिक्त दरमहा माणसी 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य (तांदूळ/गहू) देण्यात येणार आहे.

अन्नधान्य अनुदान आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य केल्यामुळे केंद्र सरकार यासाठी 26,000  कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

From Around the web