मुदतवाढीसाठी डाॅ. लहाने यांनी अखेरपर्यंत झिजवले मंत्रालयाचे उंबरठे !

मुंबई: वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. पण तत्पुर्वी या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डाॅ. तात्याराव लहाने यांनी मागील काही दिवसांपासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्याबराेबर नुकतीच दिर्घकाळ चर्चा झाली. पण अमित देशमुख यांनी डाॅ. लहाने यांना मुदतवाढ देण्यास चक्क नकार दिला असल्याचे बाेलले जात आहे. ज्यामुळे अखेर त्यांना बुधवारी वयाेमानानुसार सेवािनवृत्त करण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाचे संचालक व जे.जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डाॅ. तात्याराव लहाने मागील ३६ वर्ष वैद्यकीय सेवेत रुजू आहेत. तर मागील दाेन वर्षांपासून डाॅ. लहाने हे वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाचे संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डाॅ. लहाने यांनी मागील काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना संपर्क साधला, शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाली पण मुदतवाढ संदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
एकंदरीत डाॅ. लहाने यांना मुदतवाढ देण्यास प्रत्येकाकडून नकार आला. . कर्मचारी, नर्सेस यांना त्रास देणे तसेच जे.जे. रुग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टरांच्या कामात हस्तक्षेप करणे आदी कारणांमुळे डाॅ. लहाने यांच्यावर उच्च न्यायालयात काही डाॅक्टरांनी याचिका दाखल केल्या असून त्या न्यायप्रविष्ठ आहेत. याचीही दखल घेत मुदतवाढ देण्यात आली नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. . दरम्यान,वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाचे आता रिक्त झालेले पद एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची मािहती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
३६ वर्षाच्या दिर्घ सेवेनंतर डाॅ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त
३६ वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर डाॅ. तात्याराव लहाने बुधवारी सेवािनवृत्त झाले आहेत. . १७ मे १९८५ साली अधिव्याखाता म्हणून अंबाजाेगाई जि. बीड येथे सेवेत रुजू झाले हाेते. अंबाजाेगाई येथे असतानाच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी नेत्रशिबिरांना सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत त ६६७ शिबीरांमधून ३० लाखांच्यावर रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार केले आहेत तसेच २० लाख रुग्णांवर सर जे.जे. रुग्णालयात उपचार केले व आजपर्यंत ५० लाख रुग्णांवर तपासणी व उपचार केले आहेत.
त्याचबराेबर १८० पेक्षा जास्त शिबीरमध्ये शस्त्रक्रिया करुन १ लाख ३० हजार रुग्णांना दृष्टि परत मिळवूनदेण्याचे काम केले. डाॅ. लहाने यांना पद्मश्री पुरस्कारासह ५०० हून अधिक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. . याचबराेबर आयुष्य टास्क फाेर्स, पेडीयाट्रीक टास्क फाेर्सचे सदस्य म्हणून काेविड उपचारांच्या मार्गदर्शक सूचना सर्वांपर्यंत पाेहचविण्याचे काम केले. तसेच यापुढील काळात अंधत्व निवारण करण्याचे काम हे अविरतपणे सुरु ठेवण्याचे कार्य करत राहणार असल्याचे डाॅ. लहाने यांनी सांगितले.