माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. CBI नंतर ED ने मनी लांड्रिंगचा खटला दाखल केला आहे. , मागच्या महिन्यात देशमुखांच्या 11 ठिकाणांवर झाली छापेमारी करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटी वसुलीचा आरोप लावला होता. या प्रकरणाचा तपास CBI करत आहे. मागच्या महिन्यात देशमुख यांच्या 11 ठिकाणांवर CBI ने छापेमारी करत अनेक पुरावे गोळा केले होते. यात काही हार्ड डिस्क आणि इतर डॉक्युमेंट्स आहेत. अशी माहिती मिळत आहे की, CBI ने हे पुरावे ED ला दाखवले आणि याच आधारावर ED ने देशमुखांविरोधात खटला दाखल केला आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिड महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोप केला होता की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस उपअधिक्षक सचिन वाझेला दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले आहे. परंतु, अनिल देशमुखांनी या आरोपांचे खंडन केले होते. पण, मुंबई उच्च न्यायालयाकडून CBI चौकशीच्या आदेशानंतर देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
फक्त परमबीर सिंह यानीच नाही, तर सचिन वाझेनेही देशमुखांवर वसुलीचा आरोप लावला होता. सचिन वाझेने NIA ला दिलेल्या जबाबात म्हटले होते, 'मी 6 जून 2020 ला पुन्हा ड्युटीवर जॉईन झालो होते. मला पोलिस खात्यात घेण्याने शरद पवार खुस नव्हते. त्यांनी मला परत निलंबित करण्यास सांगितले होते. ही बाब मला स्वतः देशमुखांनी सांगितली होती. त्यांनी माझ्याकडून शरद पवारांची समजुत काढण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. इतकी मोठी रक्कम देणे, माझ्यासाठी शक्यत नव्हते. यानंतर माझी पोस्टिंग मुंबईच्या क्राइम इंटेलिजेंस यूनिट (CIU) मध्ये झाली.'
वाझेने पुढे सांगितले होते, "जानेवारी 2021 ला देशमुखांनी मला त्यांच्या सरकारी बंगल्यावर बोलावले होते. तेव्हा त्यांचा स्वीय सहाय्यक कुंदनदेखील उपस्थित होता. यावेळी त्यांनी माझ्याकडून मुंबईतील 1,650 पब, बार कडून दरमहा 3 लाख रुपये कलेक्शन करण्यास सांगितले होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो होते, शहरात 1,650 नाही, फक्त 200 बार आहेत. तसेच, मी त्यांना ही वसुली करण्यास नकार दिला होता. तेव्हा पीए कुंदन म्हणाला, आपली नोकरी वाचवायची असेल, तर साहेब म्हणतील तसे करा.."