राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस;महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय... 

राज्याच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेणार ;चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार...
 
राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस;महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती... 

मुंबई - राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.


केंद्रसरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.


दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.


मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार मात्र आम्ही सांगितलेला ५० हजाराचा साठा दिला तर राज्याची अडचण दूर होईल - नवाब मलिक 


 केंद्राने रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार मात्र आम्ही सांगितलेला ५० हजाराचा साठा दिला तर राज्याची अडचण दूर होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.


केंद्रसरकारच्यावतीने राज्यांना वाटप करण्यात येणारा रेमडेसिवीरचा डाटा जाहीर करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीने राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता देण्यात येणारा साठा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.


त्यावर केंद्राने शनिवारी २६ हजार दरदिवशी देणार होते त्यात ४० हजार अशी वाढ जाहीर केली आहे. यातून जो तुटवडा निर्माण झाला आहे तो काही प्रमाणात कमी होईल. मात्र दरदिवशी ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा अशी मागणी आहे. त्यामुळे ४० हजार दिले आहे तर त्यामध्ये १० हजाराची वाढ केल्यास राज्याची अडचण दूर होणार आहे. रेमडेसिवीरचा दहा हजाराचा साठा लवकरात लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री स्वतः केंद्राकडे मागणी करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

From Around the web