महानायक बिरसा मुंडा यांना राजकारण्यांचे अभिवादन

'कू'वर वाहिली श्रद्धांजली !
 
d

क्रांतीकारी महानायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी देशभरात अभिवादन केले जात आहे. विविध सोशल मिडीया ॲप्सवरही याचे प्रतिबिंब उमटते आहे. 'कू'वर विविध नेत्यांनी आणि सामान्यांनीही बिरसा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कू करताना म्हटले आहे, 

dss


खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले, 

d


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बिरसा यांना अभिवादन केले.

d


नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या भावना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिरसा मुंडा संग्रहालयाचं उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "बिरसा मुंडा यांनी आपले सगळे जीवन समाजासाठी दिले. देश आणि संस्कृतीसाठी आपले प्राण दिले. त्यामुळेच आजही बिरसा मुंडा जनभावनेत जिवंत आहेत."
मोदी पुढे म्हणाले, "सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. या काळात आदिवासी परंपरा आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या गाथांना भव्य रुपात समोर आणले जाईल. यासंदर्भानेच निर्णय घेतला गेला आहे, की बिरसा मुंडा यांची जयंती 'जनजातीय गौरव दिवस' म्हणून साजरी केली जाईल. या महत्वाच्या प्रसंगी मी जाहीर करू इच्छितो, की हे बिरसा मुंडा संग्रहालय देशाच्या नागरिकांना अर्पण केले जाते आहे. बिरसा यांची तपश्चर्या आणि त्याग पाहिलेली भूमी खरोखर एक पवित्र तीर्थ आहे." 
 

From Around the web