पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार

मुंबई - कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत शिक्षण विभागाची बैठक झाली, त्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते.@OfficeofUT pic.twitter.com/CQpKf9zCZN
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 15, 2021