मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याची अजब मागणी 

गांजा लागवडीच्या परवानगीसाठी कलेक्टरला अर्ज 
 
s

सोलापूर - जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात गांजा लागवड करण्याच्या परवानगीसाठी चक्क  कलेक्टरला अर्ज दिला आहे. शेतकऱ्याच्या या अजब मागणीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अनिल आबाजी पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर ( सो.) येथे या शेतकऱ्याची शेती आहे. त्यातील दोन एकरमध्ये गांजा लागवड करण्याची परवानगी त्यांनी कलेक्टरकडे मागितली आहे. 

शेतात कोणतेही पीक घेतले तरी शासन त्याला हमीभाव देत नसल्यामुळे शेती तोट्यात आहे. शेतीभावाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीचा खर्च देखील निघत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता, बिल वेळेवर मिळत नाही. 

दुसरीकडे गांजाला चांगला भाव असल्यामुळे दोन एकर मध्ये गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. १५ सप्टेंबर पर्यंत परवानगी द्यावी अन्यथा १६ सप्टेंबर रोजी परवानगी आहे असे गृहीत धरून गांजा लागवड करणार आहे, त्यानंतर  गुन्हा दाखल झाला तर त्यास प्रशासन जबाबदार आहे, असे या अर्जात म्हटले आहे. 

d

From Around the web