ऑनलाइन लर्निंगमध्ये शिक्षकांचा शिकवण्याची नवी पद्धत वापरण्यावर भर

 
 ऑनलाइन लर्निंगमध्ये शिक्षकांचा शिकवण्याची नवी पद्धत वापरण्यावर भरमुंबई -  हायब्रीड लर्निंग हे शिक्षणातील न्यू नॉर्मल झाल्यापासून, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवण्यासाठी नव्या पद्धती अंमलात आणत असल्याचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी जगातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म असलेल्या ब्रेनलीने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. कोव्हिड-१९ मुळे जगभरातील शिक्षणाच्या वेगावर परिणाम झाला. तथापि सकारात्मक पैलू पाहता यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली असल्याचे दिसते.


ऑनलाइन क्लासेसमध्ये शिक्षकांनी शिकवण्याची नवी पद्धत वापरली का, हे तापसण्यासाठी ब्रेनलीने यूझर्सना प्रश्न विचारले. ५७.८% सहभागींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर २२.३ टक्के लोकांनी शिकवण्याच्या पद्धतीतील बदल ओळखणे कठीण असल्याचे म्हटले. फक्त (१९.९%) एक पंचमांश लोकांनी म्हटले की, शिकवण्याची पद्धत अजूनही तीच आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मान्य केले की, शिक्षकांनी आता नवी पद्धती अवलंबली आहे. आणखी एका प्रश्नातून हे सिद्ध झाले की, अभ्याक्रमात विद्यार्थ्यांना रस निर्माण होण्यासाठी शिकवण्याची पद्धत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. या सर्वेक्षणात देशभरातील २२७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


६४.८% विद्यार्थी ठामपणे म्हणाले की, शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे एखाद्या विषयाच्या रुचीवर परिणाम होतो. एक पंचमांश म्हणजेच फक्त १९.३% विद्यार्थ्यांनी इतर भूमिका घेतली.


विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमध्ये उत्साही वाटतेय का, असा प्रश्न ब्रेनलीने विचारला असता ५२.६% विद्यार्थी म्हणाले की, यापुढेही ऑनलाइन क्लास व्हावेत तर ३१.६% विद्यार्थ्यांनी पारंपरिक वर्गाला पसंती दिली. योग्य करिअर निवडण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतात का, या प्रश्नाचे उत्तर ५४.१% विद्यार्थ्यांनी होकारार्थी दिले. शिक्षकांनी त्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. तर २८.१% विद्यार्थ्यांनी नकारार्थी उत्तर दिले. शिक्षकांच्या मार्गदर्शनावर १७.८% विद्यार्थ्यांनी तटस्थ भूमिका घेतली.

From Around the web