एसटी महामंडळाच्या संपासंदर्भात सरकारची भूमिका असंवेदनशील - फडणवीस 

 
s

मुंबई  - सध्या राज्यभरात विविध प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकार अजूनही मागण्या मान्य करत नसल्याने कर्मचाऱ्यांची आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कायम आहे. 

देवेंद्र फडणवीस नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विचारलं असता त्यांनी सविस्तर उत्तर दिले. फडणवीस यांनी त्याचा व्हीडिओ 'कू' वर पोस्ट केला आहे. ते म्हणतात, 'एसटी महामंडळाच्या संपासंदर्भात सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. हा संप चिघळू नये हे आम्हालाही वाटतं. पण सरकार केवळ दमनशाहीच्या जोरावर, लोकांवर कारवाई करून संप मिटवू पाहते आहे. त्यातून आंदोलन अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. काहीतरी दिलासा सरकारनं कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे. इतक्या आत्महत्या झाल्यावरही सरकार जागं होणार नसेल तर हे चुकीचं आहे. गोपीचंद पडळकर असतील, आमचे इतर आमदार असतील, सदानंद खोत असतील, सगळे लोक आंदोलन करत आहेत. सरकारने याची दखल घेतली पाहिजे. आम्ही पाहिजे ते सहकार्य सरकारला करू.'

विधानपरिषद निवडणुकीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, 'विधानपरिषदेची निवडणूक घोषित झाली आहे. आम्ही लवकरच स्टेट इलेक्शन कमिटीची मिटिंग घेऊ. भाजपचे उमेदवार कोण असतील ते आम्ही ठरवू. ती शिफारस आम्ही केंद्राला पाठवू. आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि अध्यक्ष त्याला मान्यता देतील. थोडी वाट बघा.'

दरम्यान सरकार आणि विरोधी पक्षात संपावरून आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.  सरकारने मंगळवारी रात्री एसटी स्थानकातून खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या गाड्या सोडल्या. प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.

From Around the web