एकनाथ खडसे यांच्यावरील मीम्स पाहून तुम्ही नक्की हसाल 

‘आता काय आमचा बाजार उठवल्यावर सीडी लावणार का?’ 
 
एकनाथ खडसे यांच्यावरील मीम्स पाहून तुम्ही नक्की हसाल

जळगाव  - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राजकीय गोटात भूकंप झाला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर विविध मिम्स व्हायरल होत आहेत. जळगावात एकनाथ खडसे यांच्यावरील एक मिम्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मागे शुक्लकाष्ट लागल्याचे दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासमोर तर सारख्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादीला हैरान करून सोडले आहे. सुरुवातीला पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरही अत्याचाराचे आरोप एका महिलेने केले. ते प्रकरण शमले असतानाच करुणा मुंडे यांनी आपल्या मुलांना डांबून ठेवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी झाली.

त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित १०० कोटींच्या वसुलीच्या पत्रावरून तर राष्ट्रवादीसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिली आहे. तरी कुठेतरी शरद पवार हे अस्वस्थ असल्याचे दिसत आहेत. हाच मुद्दा धरून नेटकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 
सध्या एक मीम्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे आहे असे की, पूर्वी भाजपमध्ये असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी ईडीकडून धमकी मिळत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. भाजप सोडताना त्यांनी ‘तुमच्याकडे ईडी आहे तर माझ्याकडे सीडी’ आहे असा इशारा भाजपला दिला होता. ‘माझ्याकडे असलेल्या सीडीमध्ये अनेक कारनामे दडलेले आहेत, योग्य वेळ आली की ती सर्वांसमोर मांडेल’ अशी वल्गना खडसेंनी त्यावेळी केली होती.

पण आता राष्ट्रवादी संकटात असतानाही खडसे शांत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय पक्षावर होत असलेल्या आरोपांवर काहीही प्रतिक्रिया दिल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यातील संभाषणाचा फोटो पोस्ट केला जात आहे. सोबतच विनोदी मजकूर लिहिलेले मीम्स तयार केले जात आहे. यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.

From Around the web