हिंजवडीच्या राम मंदिराच्या वर्षपूर्तीनिमित्त कीर्तन, महाप्रसाद     

  भंगारमाल वेचणाऱ्या बाळू मावशीं धुमाळ यांचा उपक्रम   
 
हिंजवडीच्या राम मंदिराच्या वर्षपूर्तीनिमित्त कीर्तन, महाप्रसाद

पुणे: भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळूमावशी धुमाळ यांच्या  माण-हिंजवडी-गवारवाडी  खिंडीतील राम मंदिराच्या वर्षपूर्तिनिमित्त  आरती, कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महा प्रसाद वाटून परिसरातील उपस्थित  भाविकांचे तोंड गोड केले.   

 वारकरी संप्रदायातील बाळूमावशीनी २६ फेब्रुवारी २०२० रोजी राम मंदिर उभारून तेथे राम लक्ष्मण - सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.याच राम मंदिरमध्ये आज आनंदोत्सव साजरा  करण्यात आला. सोशल डिस्टंन्स चे नियम पाळून हे कार्यक्रम पार पाडले.

अशीक्षित असलेल्या बाळूबाई धुमाळ यांनी भंगार मालाच्या  व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले आणि साधू संताना बोलावून प्रतिष्ठापनेचा भव्य कार्यक्रम केला होता. या मंदिरासाठी जयपूर वरून मूर्ती आणण्यात आल्या होत्या .करवीर पिठाच्या शंकराचार्यांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती . 

From Around the web