पोलीस आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त वेषांतर करून जेव्हा पोलीस स्टेशनला भेटी देतात.... 

तेव्हा पिंपरी - चिंचवड भागातील पोलिसांची बसली पाचावर धारण...  
 
s

पिंपरी - चिंचवड : एखाद्या  हिंदी चित्रपटात घडावा असा प्रसंग पिंपरी - चिंचवडमध्ये घडला आहे. डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी चक्क वेषांतर करून पोलीस सर्वसामान्य नागरिकांना कश्याप्रकारे वागणूक देतात याचा स्वानुभव घेतला. बुधवारी (दि. 5) रात्री पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चेहऱ्यावर दाट झुबकेदार दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग लावून त्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली. सलवार कुर्ता आणि मास्क असा वेष परिधान करून आयुक्त बनले 'जमालखान कमालखान पठाण'. तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम.

वेषांतर केलेले हे पठाण दांपत्य पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले. सुरुवातीला आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. 'आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल आठ हजार रुपये सांगितले', अशी तक्रार त्यांनी केली. नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

मध्यरात्री सव्वाबारा वाजता पठाण दांपत्य पिंपरी पोलीस ठाण्यात खासगी टॅक्सी करून गेले. 'रुग्णवाहिकावाला आम्हाला लूटतोय, आमची तक्रार दाखल करून घ्या', अशी मागणी पठाण दांपत्याने केली. त्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांनी पठाण यांना 'हे आमचे काम नाही' असे म्हणून झिडकारले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अशी वागणूक देत असल्याने पठाण झालेले पोलीस आयुक्त संतापले. त्यांनी तात्काळ आपली ओळख दाखवत संबंधित पोलिसांना विचारणा केली.

हा वाईट अनुभव घेऊन पठाण दांपत्याने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करून वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांपत्य असल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड, तर वाकड पोलीस चौकीत मध्यरात्री दोन वाजता पठाण दांपत्य झालेल्या आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी भेट दिली.

अंगात घातलेला झब्बा, चेहऱ्यावर लावलेली दाढी, तांबडे केस आणि भाषेचा लहेजाही अगदी मुस्लिम बांधवांसारखा. त्यामुळे कोणत्याही पोलिस ठाण्यांत पोलिस आयुक्तांना कोणीच ओळखलेच नाही. मात्र, सर्व झाल्यावर जेव्हा आयुक्तांनी दाढी काढून आपण आयुक्त असल्याचे सांगितले, तेव्हा मात्र सर्वच पोलिस अवाक झाले. पोलिस आयुक्तच खान मियाँ बनून आले होते, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

सर्वप्रथम हिंजवडी पोलिस ठाण्यात जात कृष्ण प्रकाश यांनी बेगमची काही मुलांनी छेड काढल्याची तक्रार दिली. हिंदी आणि उर्दू भाषा बोलत कृष्ण प्रकाश यांनी हुबेहूब खानमियाँ साकारल्याने तक्रार दाखल करणारे पोलिस आयुक्तच आहेत, याची साधी कल्पनाही कोणाला आली नाही. हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेऊन त्वरित घटनास्थळी भेटही दिली. त्यानंतर मियाँ, बेगमने वाकड पोलिस ठाण्यात हजेरी लावली. तेथे सोनसाखळी चोरल्याची तक्रार दिली. शेवटी हे 'जोडपे' पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाले.

आम्हाला करोनारुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका हवी आहे. मात्र, रुग्णवाहिकाचालक जादा पैसे मागतोय. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा,' असे हे 'जोडपे' पोलिसांना सांगते. मात्र, जेवढ्या तत्परतेने हिंजवडी आणि वाकड पोलिस ठाण्यांत कार्यवाही करण्यात आली, तेवढी तत्परता पिंपरी पोलिस ठाण्यात दिसून आली नाही. 'हे आमचे काम नाही, पिंपरी चौकीत जा,' अशी कारणे तेथे उपस्थित पोलिसांनी दिली. मात्र, जेव्हा समोर उभे असलेले मियाँ आणि बेगम पोलिस आयुक्त आणि सहायक आयुक्त असल्याचे समजताच सर्वच अवाक झाले.

करोनाकाळात काही निर्बंध असले तरी पोलिस नागरिकांशी कसे वागतात, हे पाहण्यासाठी मियाँ आणि बेगमच्या वेषात पोलिस ठाण्यांना भेट दिली. हिंजवडी, वाकड पोलिस ठाण्यांत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपरी पोलिस ठाण्यात थोडा उशिरा प्रतिसाद मिळाला. - कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड

................

'वेषांतर करून पोलिस ठाण्यांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. आपली अडचण घेऊन तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांशी पोलिसांचा व्यवहार कसा आहे, हे पाहण्यासाठी पोलिस ठाण्यांना भेट दिली.'' - प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त

From Around the web