दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी   

आज अंगारकी चतुर्थी
 
sd

पुणे : कोरोनाच्या पाश्वभूमीवर मंदिर बंद असले तरी आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.आज अंगारकी चतुर्थीच्यानिमिताने ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.या वर्षातील हि दुसरी अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घाव लागणार आहे. भक्तांनी गर्दी न करता ऑनलाईनच्या माध्यमातूनच बाप्पाच दर्शन घाव असं आव्हान देखील त्रासाच्या वतीने करण्यात आलं आहे.

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

From Around the web