पुण्यात तडीपार गुंडांकडून सहाय्यक फौजदाराची हत्या 

 
d

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ एका तडीपार गुंडाने फरासखाना पोलीस ठाण्यातील  सहाय्यक फौजदार समीर सय्यद यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

 मध्यरात्री एकच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेनंतर गुंड प्रवीण महाजनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुंडाने चक्क पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याने पुणे शहर हादरुन गेलं आहे. शिवाय या कुख्यात गुंडाचं इतकं डेअरिंग कसं काय होऊ शकतं हा प्रश्न आहे. जर एखाद्या गुंडाची पोलिसाची हत्या करण्यापर्यंत मजल जात असेल, तर पुणे पोलिसांचा वचक राहिलाय की नाही हा प्रश्न आहे.


सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे काल ड्युटीवर होते. रात्री ड्युटी आरोपून ते घराकडे निघाले होते. त्यावेळी गुंड प्रवीण महाजनने त्यांना बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ रात्री 1 च्या सुमारास गाठलं. तिथे त्याने सय्यद यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रवीण महाजनने समीर सय्यद यांचा गळा चिरला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड नेमकं का झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोण आहे गुंड प्रवीण महाजन ?

  • प्रवीण महाजन हा तडीपार गुंड आहे.
  • डबल तडीपार आरोपीचा बुधवार पेठेत होता वावर
  • प्रविण महाजनवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत

From Around the web