नगरसेविका एकबोटे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान

 
नगरसेविका एकबोटे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान

पुणे : नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे व भाजपा युवती आघाडीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेत एकबोटे हॉस्पिटल, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर येथे आयोजिलेल्या या शिबिराला युवक-युवतींनी कोरोनाची भिती न बाळगता चांगला प्रतिसाद दिला. आचार्य आनंदऋषीजी पुणे रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजिले होते. 

या शिबिराच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध निर्भयतेने लढण्याचा आणि यशाची खात्री बाळगण्याचा संदेश असंख्य समाज बांधवांपर्यंत पोचविण्याचे मौलिक कार्य एकबोटे मायलेकीनी केले आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुवून स्वच्छतेची काळजी घेणे या बाबींविषयी प्रबोधन करण्याचे जागृतीचे काम या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पार पडले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मिलिंद एकबोटे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, प्रा. डॉ. गायत्री एकबोटे, संजय एडके यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समूह संपर्क प्रमुख धनंजय काळे, दिपक मराठे, भाजप शहर सरचिटणीस संदीप लोणकर व गणेश घोष, चरणजीत सिंग सहानी, प्रतुल जागडे, गणेश बगाडे, शैलेश बडदे, मिलिंद टकले, राहुल शिरोळे, माणिक दुर्गे, उमेश गोरे, किरण ओरसे आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काही रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात मॉडर्न महाविद्यालयाचे एनएसएस युनिट प्रमुख प्रा. प्रभाकर वराडे, राजन देवकाते, ऋषिकेश कोंढाळकर, अमृत कदम, सुरज दरेकर, प्रकाश साबळे, विलास लाड, सिद्धी वाघोलीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
 

From Around the web