हॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी बुधवारी नोकरी मेळावा

 
हॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी बुधवारी नोकरी मेळावा
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन केले आहे. कार्निव्हल जगातील सर्वात मोठ्या क्रूजसह अन्य क्रुज कंपन्या आणि देशविदेशातील पंचतारांकित हॉटेल्स या जॉबफेअरमध्ये तरुणांना नोकरीची संधी देणार आहेत. येत्या बुधवारी (दि. 13) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल-टुरिझममध्ये हॉटेल मॅनेजमेंट संबंधित सर्वांसाठी हा नोकरी मेळावा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व ईक्लॅट हॉस्पिटालिटीच्या दीपाली पात्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘सुर्यदत्ता’च्या संचालिका (जनसंपर्क) कॅप्टन शालिनी नायर, चेतन मुनगंटीवार, नुतन गवळी, ईक्लॅटच्या अनुराधा खोत आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘सुर्यदत्ता ग्लोबल सीएसआर इनिशिएटिव्ह फॉर इंटर्नशीप अ‍ॅन्ड प्लेसमेंट्स’ अंतर्गत या जॉबफेअरचे आयोजन केले आहे. जगातील सर्वात मोठी क्रूज कंपनी असलेल्या कार्निव्हलसह पी अँड ओ क्रुजेस, कोस्टा, हॉलंड अमेरिका लाईन, कुनार्ड, सीबर्न, प्रिन्सेस क्रुजेस आदी क्रूज कंपन्या, त्याचबरोबर रिट्झ कार्लटन, ताज विवांता, ल मेरिडियन, नोवाटेल, डबल ट्री बाय हिल्टन, हयात रिजेन्सी, ओकवुड रेसिडन्स, आयबीस, कॉनरॅड, द प्राईड, हॉलिडे इन, आयएसएस फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि मलाका स्पाईस यांसह वीसहून अधिक पंचतारांकित हॉटेल्स या जॉबफेअरमधून तरुणांना निवडणार आहेत.

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले व सध्या काम करत असलेले तरुण या जॉबफेअरमध्ये सहभागी होऊ शकतात. सर्वच हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नातील नोकरी मिळावी, या उद्देशाने सूर्यदत्ता हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसह इतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सध्या विविध हॉटेलांत नोकरी करणार्‍या तरुणांना संधी देण्यासाठी हा नोकरी मेळावा उपयुक्त ठरेल, असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.  

या जॉबफेअरमध्ये सहभाग घेण्यासाठी कागदपत्रांसहित संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. www.eclathospitality.com/pune या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी दीपाली पात्रीकर (९०६७१२९४८२), अनुराधा खोत (९९७५५८५७९५) यांचेशी किंवा ८९५६९३२४०८, ८९५६९३२४१५ या क्रमांकावर, तसेच schmttsuryadatta.edu.in, infosuryadatta.edu.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
-------------------

From Around the web