केशवनगर भागात ड्रेनेज लाईन फुटली, घाण पाणी रस्त्यावर !

 
केशवनगर भागात ड्रेनेज लाईन फुटली, घाण पाणी रस्त्यावर !


केशवनगर ( मुंढवा ) - पुणे उपनगर मधील  केशवनगर ( मुंढवा ) मध्ये   मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन फुटून घाण पाणी रस्त्यावर साचल्याने पादचारी आणि वाहन चालकांना तारेवरची  कसरत करावी लागत आहे.

मुंढवा ते केशवनगर या मुख्य रस्त्यावर  श्री अमृतेश्वर मंदिर ते जनसेवा बँक या  दरम्यान  ड्रेनेज लाईन वारंवार फूटत आहे. त्यात पावसाचे पाणी साचत आहे. या घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने सातत्याने या ठिकाणी पाणी साचत आहे.

मुख्य रस्त्यावरच पाणी साचत असल्याने रोगराई पसरत  आहे तसेच पादचारी आणि वाहन चालकांना तारेवरची  कसरत करावी लागत आहे. याकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

केशवनगर भाग पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट होवून दोन वर्षे झाली तरी नागरी समस्या कायम आहेत, या भागात एक दिवसाआड पाणी येते तेही अर्धा तास. त्यामुळे पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच या भागातील अतिक्रमणे कायम असून, रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. नगरसेवक आणि पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

From Around the web