राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभाग कार्याध्यक्षपदी पाटील

 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभाग कार्याध्यक्षपदी  पाटील
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साहित्य,कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी पुण्यातील युवा कार्यकर्ते बाबासाहेब पाटील यांची निवड झाली आहे . 

बाबासाहेब पाटील  यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते १३ मार्च रोजी मुंबईत नियुक्ती पत्र देण्यात आले.

२०१७ पासून  बाबासाहेब पाटील यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस च्या साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे . राष्ट्रवादी पर्यावरण सेल शहर अध्यक्ष ,वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य ,जैवविविधता समिती सदस्य या पदांवरही त्यांनी काम केले आहे . 

बाबासाहेब पाटील यांनी राजकीय वारसा नसताना स्वःताच्या कार्य व प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर  मजल गाठली आहे . २००८ मध्ये अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी युवक मध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी,२०१२ मध्ये राष्ट्रवादी पर्यावरण सेलच्या शहर अध्यक्ष पदी निवड,२०१४ ला पुणे महानगरपालिका मध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या समिती वर निवड,२०१६ ला पुणे महानगरपालिका मध्ये जैवविविधता समिती,(BDP) वर निवड,२०१७ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या शहर अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्या हस्ते निवड,आज पर्यंत पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनिय कामा बद्द्ल पुणे महानगरपालिकाचा पर्यावरण मित्र पुरस्कार,पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने पक्षी मित्र म्हणून पुरस्कार तसेच महाराष्ट्र प्रदेश आय काँग्रेस वतीने राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार देण्यात आला आहे.
--------------------

From Around the web