इंग्लंडमधून आलेल्या पुण्यातील तरुणाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 

 
इंग्लंडमधून आलेल्या पुण्यातील तरुणाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

पुणे - इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका तरुणाचा  करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का, हे तपासण्यात येणार आहे. 


१३ डिसेंबर रोजी तो व्यक्ती पुण्यात परतला होता. १७ तारखेला त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे  त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. 

ब्रिटनमध्ये करोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच पुण्यात परतलेल्या एका व्यक्तीमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाला कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप आणि मध्यपूर्व आशियातून राज्यात ५४४ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३०० प्रवासी पुण्यातील असून, त्यांचा शोध लागला आहे. या सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वावरे यांनी दिली.

From Around the web