बीडीपी जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची पालिका आयुक्तांकडे मागणी    

  'ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड 'चे आयुक्तांना निवेदन 
 
बीडीपी जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची पालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : महानगरपालिकेच्या हद्दीतील जैव वैविध्य उद्यानांच्यासाठी राखीव जागांवर(बीडीपी )मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत ,त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी 'ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड 'ने  पालिका आयुक्तांकडे  निवेदनाद्वारे केली आहे. 

'ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड'चे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण यांनी सोमवारी हे निवेदन पालिका आयुक्त कार्यालयात दिले. 

पुण्यात नगरसेवक,लोकप्रतिनिधी देखील बीडीपी राखीव जागांवर प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामे करीत आहेत.सिंहगड आणि वारजे भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. हिंगणे,तुकाई नगर वडगाव,आंबेगाव,समर्थ नगर,टिळक नगर या सिंहगड रस्ता परिसरात तसेच बावधन,भूगाव मध्ये अनधिकृत  बांधकामातुन बीडीपी चे आरक्षण गिळंकृत केले जात आहे,ही गंभीर बाब आहे असे या निवेदनात म्हटले आहे. 

महापालिकेच्या बांधकाम विभागाला सांगून ,पाठपुरावा  कारवाई होत नसल्याने बांधकामे वाढून शहराचे विद्रुपीकरण होत आहे.बीडीपी प्रकरणी तातडीने कारवाई करावी ,अशी मागणी या निवेदनाद्वारे सनी लक्ष्मण निम्हण यांनी केली आहे.       

From Around the web