बांधकाम मजुराच्या मृत्यूच्या तपासाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

सामाजिक कार्यकर्ते सनी लक्ष्मण निम्हण यांचे आयुक्तांना निवेदन 
 
बांधकाम मजुराच्या मृत्यूच्या तपासाची पोलीस आयुक्तांकडे मागणी
कासट -बियाणी बिल्डर्स वर कारवाई करण्याची मागणी 

पुणे : पाच दिवसा पूर्वी  धायरी -नऱ्हे  रस्त्यावर  'पारी ' कंपनीच्या जागेवर ' अर्बन होम रिआलिटी ' ,पारी टॉवर्स या बांधकाम साईटवर कार्यरत कामगाराचा  पंधराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास करून कासट -बियाणी बिल्डर्स वर कारवाई करावी ,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सनी लक्ष्मण निम्हण यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे .

 

पाच दिवसापूर्वी या बांधकाम मजुराचा पंधराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते सनी लक्ष्मण निम्हण यांना दिली . अशा पद्धतीने सुरक्षित साधने नसताना बांधकाम करणे आणि मनुष्यहानीला कारणीभूत होणे, हा गंभीर गुन्हा आहे. तरीही पाच दिवस दखल घेतली गेलेली नाही,ही गंभीर बाब असल्याने आयुक्तांनी तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत ,असे निम्हण यांनी निवेदनात म्हटले आहे. 

बिल्डरच्या निष्काळजीपणे  झालेल्या मृत्यूचा तपास करून  कारवाई करावे,  तातडीने दखल घेऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा,अशी  विनंती त्यांनी या निवेदनात केली आहे . पुण्यात हजारो बांधकाम साईटवर सुरक्षा साधने मजुरांना न देता निष्काळजीपणे बांधकामे सुरु असून मजुरांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ,असे निम्हण यांनी म्हटले आहे .

 
 

From Around the web