संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 'विश्वमाऊली' विषयावर निबंध स्पर्धा

पुणे : श्री संत सेवा संघातर्फे 'संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज -विश्वमाऊली' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यावर्षी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला ७२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने श्रीज्ञानेश्वर महाराजांचे अवतार कार्य सर्वांच्या लेखणीतून प्रकट होऊन श्रीमाऊलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाला त्यांच्या चरणी ही लेखनसेवा रुजू करता येईल, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे . केवळ चरित्रात्मक लिखाण न करता संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अत्यंत कमी वयात केलेले कार्य, त्याची व्याप्ती, सार्वकालिकता, अप्रतिहत वाङ्मयसंपदा, मानवी जीवनाच्या विकासाचा सर्वकष विचार, आत्मानुभूतीजन्य व कृतार्थता प्रदान करणाऱ्या ग्रंथांची निर्मिती अशा मुद्द्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
ही स्पर्धा तरुण व ज्येष्ठ अशा २ गटातून होईल.तरुण गट वय वर्षे १५ ते २५ , ज्येष्ठ गट- वय वर्षे २६ पासून पुढे असे हे गट आहेत . शब्दमर्यादा १ हजार असून निबंध मराठी भाषेतून लिहावा. ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा घेत आहोत.
निबंध ए-४ आकाराच्या फुलस्केप कागदावर सुवाच्य अक्षरात, काळ्या शाईने लिहून, स्कॅन करून पी.डी. एफ्. करुनच किंवा मराठी फॉन्ट मध्ये टाईप करुन पी. डी. एफ्. करुनच ८४८४८ ०३३४३ या क्रमांकावर व्हाटस्अॅप ने पाठवावे. निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ ही आहे .
प्रत्येक सहभागी स्पर्धक लेखकास ई-प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. सदर करंडक व स्मृतिचिन्हे कुरिअरद्वारे पाठवण्यात येतील. या निबंधस्पर्धेसाठी तज्ज्ञ परीक्षक नियुक्त केले आहेत व त्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. प्रथम क्रमांकास श्री अरविंद करंडक व ई-प्रशस्तिपत्रक द्वितीय व तृतीय क्रमांक स्मृतिचिन्ह व ई-प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे .
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
श्री संत सेवा संघ
दूरध्वनी क्रमांक - ८४८४८ ०३३४३