कोंबड्या अंडी देत नाहीत म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल 

तक्रार बघून लोणी काळभोर  पोलिसही चक्रावले 
 
कोंबड्या अंडी देत नाहीत म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

पुणे - कोंबड्या अंडी देत नाहीत म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्री फार्म चालकांनी   लोणी काळभोर  पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रार बघून लोणी पोलिसही चक्रावले  असून, याप्रकरणी अद्याप तरी गुन्हा दाखल झालेला नाही. 


लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी मागील आठ दिवसापासून अंडी देणं बंद केलं असून, यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोल्ट्री चालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. 


लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी याविषयी बोलताना म्हणाले,”म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी ११ एप्रिल रोजी एका कंपनीचे कोंबड्या करिता असलेलं खाद्य घातलं होतं. ते खाद्य दररोज दिलं जात होतं. ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांचं अंडी देणंच बंद झालं. यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणं बंद झालं असल्याचं प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. 

या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल,” अशी माहिती देण्यात आली.

From Around the web