माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

 
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर  पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करत त्यांना सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर नेहून डांबून ठेवत गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. 

 जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यांना सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर डांबून ठेवले. इतकेच नाही तर त्यांच्या गळ्याला चाकू लावून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला गेला, असा आरोप महाजन यांच्यावर करण्यात आला आहे.. 

याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजनासह तानाजी भोईटे, वीरेंद्र भोईटे आणि निलेश भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

From Around the web