हस्तीमल मुनोत यांना 'सूर्यदत्ता'तर्फे 'सुर्यगौरव समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान 

 
हस्तीमल मुनोत यांना 'सूर्यदत्ता'तर्फे 'सुर्यगौरव समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

पुणे : समाजकारण, वित्तीय क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारे अहमदनगर मर्चंट बँक व केशरचंद गुलाबचंद संस्थेचे संस्थापक ऋषीतुल्य हस्तीमल मुनोत यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटतर्फे दिला जाणारा 'सुर्यगौरव समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला.

 हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार व सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया  यांच्या हस्ते मुनोत यांचा त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. प्रसंगी 'सूर्यदत्ता'चे कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल उपस्थित होते.

प्रसंगी बोलताना पोपटराव पवार म्हणाले, "हस्तीमलजी यांनी शिक्षण, वित्त, उद्योग, समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. एवढी वर्षे त्यांच्या हातून झालेले विधायक कार्य हे निश्चितच दिशा देणारे व प्रेरक आहे. त्यांच्या या कार्याने मागील पिढीतील सर्वाना आत्मविश्वास व प्रेरणा तर दिलीच; पण भविष्यातही पुढे कित्येक पिढ्यासाठी एक मानदंड घालून दिला आहे."

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "काही व्यक्तीमत्वाचा सन्मान केल्याने पुरस्काराचीच उंची वाढते. हस्तीमलजी यांचे व्यक्तिमत्व असेच आहे. समाजाच्या सेवेत त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. अशा कर्मयोगी, व्यासंगी व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे."

From Around the web