हिंजवडीच्या  मंदिरात जन्माष्टमी महोत्सव   

  भंगार वेचणाऱ्या बाळू मावशींचा उपक्रम  
 
S

पुणे: भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळू मावशी धुमाळ त्यांच्या  माण-हिंजवडी-गवारवाडी  खिंडीतील राम, कृष्ण, विठ्ठल मंदिरात २९ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला इस्कॉन प्रतिनिधींच्या सहकार्याने भजन,कीर्तनाचे आयोजन केले होते. यानिमित्त रांगोळया काढण्यात आल्या आणि लहान मुलांनी कृष्ण, गोपांची वेशभूषा केली.धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सायंकाळी प्रसाद  वाटप करण्यात आले. वारकरी संप्रदायातील बाळू मावशीनी विठ्ठल, रुक्मीणी, राम, हनुमान मंदिर उभारून तेथे राम लक्ष्मण - सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच कृष्णाची ,महादेवाची मूर्ति देखील आहे. अशिक्षित असूनही श्रद्धेपोटी त्यांनी व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले आणि साधू संताना बोलावून प्रतिष्ठापनेचा भव्य कार्यक्रम केला होता. या मंदिरासाठी जयपूर वरून मूर्ती आणण्यात आल्या होत्या .करवीर पिठाच्या शंकराचार्यांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती . 

 दर वर्षी तेथे हरिनाम सप्ताह करतात.स्वखर्चाने या परिसरातील दिंडी त्या हरिद्वार,काशीला घेऊन गेल्या आहेत. त्या अयोद्ध्येला ६ वेळा जाऊन आल्या आहेत.राम मंदिर बांधकाम  सुरु झाल्यावर परवानगी घेवून त्या अयोध्येला जाणार आहेत. 
 

From Around the web