कॉल सेंटर मधून घरी जाताना अपहरण करून बलात्कार 
 

 
कॉल सेंटर मधून घरी जाताना अपहरण करून बलात्कार

पुणे -खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचे अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. ती गुरुवारी रात्री काम झाल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी एका तरूणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने तिला गाठत मारहाण केली. नंतर बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि खराडीतील एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे तरुणीवर आरोपीनं बलात्कार केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या तरुणीला येरवडा येथील गुंजन चौकात आणून सोडले.

झालेल्या घटनेनं तरुणी हादरून गेली. त्याच अवस्थेत तरुणीने तात्काळ घडलेली घटना मित्राला फोन करून सांगितली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानुसार तक्रार दाखल करून घेतली. घटना घडलेल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यात आरोपीची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला काही तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले.

From Around the web