मुंढव्यातील मारुती कार शोरूमला आग

सहा कार जळून खाक, फर्निचरचे दुकानही भस्मसात
 
मुंढव्यातील मारुती कार शोरूमला आग

पुणे : मुंढवा पोलिस चौकीजवळ असलेल्या महालक्ष्मी मारुती सुझुकी शोरुमला  रविवारी पहाटे  आग लागून  सहा कार जळून खाक झाल्या तसेच मध्यंतरी लागलेल्या आगीत एक फर्निचर दुकान जळून खाक झाले.  

मुंढवा येथील स्मशानभूमीजवळ मोठे फर्नीचरचे दुकान आहे. शहरातील विविध मॉलमध्ये असणारे फर्नीचर संबंधित गोडाऊनमध्ये ठेवण्यात येते. गोडाऊनला शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता आग लागली. आगीची वर्दी मिळताच 5 बंब व 3 पाण्याचे टैंकर घटनास्थळी दाखल झाले. फर्निचर असल्याने आग विझविन्यात अडचण येत होती, त्यामुळे जेसीबी मशीन बोलावून फर्निचर बाजूला करुन आग विझविली. फोम, प्लायवूड, कापड, काचा यामुळे आग वाढली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासातच मुंढव्यातीलच एका कार शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दोन्ही ठिकाणी अग्निशामक दलाने तत्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, पहाटे अडीच वाजता मुंढवा पोलिस चौकीजवळ असलेल्या महालक्ष्मी मारुती सुझुकी सेंटर शोरुम या दुकानाला आग लागली. 40 हजार स्क्वेयर फुट पैकी 20 हजार स्क्वेअर फुट जागेत आग लागली होती. आगीमध्ये 5 ते 6 कार जळाल्या. तसेच शोरूमचे बांधकाम, फर्नीचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे, विभागीय अधिकारी रमेश गांगड, केंद्र अधिकारी विजय भिलारे व केंद्र अधिकारी प्रकाश गोरे यांच्यासह असंख्य जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम केले.

From Around the web