पुणे शहराच्या हद्दीलगत असलेली २३ गावे  महापालिकेत समाविष्ट 

 राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाची पुणे महापालिका होणार 
 
पुणे शहराच्या हद्दीलगत असलेली २३ गावे  महापालिकेत समाविष्ट

पुणे  -  पुणे शहराच्या हद्दीलगत असलेली वडाची वाडी, नांदोशी सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांजरी बुद्रुक , नऱ्हे, मंतरवाडी, शेवाळेवाडी आदी  २३ गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना राज्यसरकारने आज प्रसिद्ध केली. यामुळे पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका आणि शहर ठरले आहे.

पुणे शहराच्या हद्दीलगतची ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार २०१७ साली पहिल्या टप्प्यात ११ गावं तर उर्वरित २३ गावं पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार आज २३ गावांची अधिसूचना जारी करण्यात आली.

आता याबद्दल कोणत्याही व्यक्तीला हरकती किंवा सूचना असल्यास विभागीय आयुक्तांकडे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. आता २३ गावे महापालिकेत समाविष्ट होणार असल्याने राज्यातील सर्वाधिक मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका ठरली आहे.

ही  २३ गावे होणार समाविष्ट

वडाची वाडी, नांदोशी सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांजरी बुद्रुक , नऱ्हे, मंतरवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, औताडे-हांडेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि होळकरवाडी, वाघोली, किरकटवाडी, खडकवासला, महाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, पिसोळी

From Around the web