गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक...

 
गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक...

पुणे  - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभरात केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील मंडई येथे महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदविला. 

मागील १५ दिवसामध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील एक वर्षामध्ये कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशी परिस्थिती असताना केंद्रसरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशीलता दाखवत दरवाढ केली आहे.                                                                 

गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोल पंपावर लावलेले सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल, इतकं लक्षात असू द्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

From Around the web