पुण्यात नवा रान गवा दाखल (Video)
गव्याचा पुन्हा गवगवा सुरु ...
Updated: Dec 22, 2020, 11:00 IST

पुणे - पुण्यात पुन्हा एकदा रान गवा आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. १३ दिवसापूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा आज हा रानगवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडालेली आहे.
या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान देखील प्रशासनासमोर आहे...पुण्यातील बावधन हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलिस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. रेस्क्यू करण्याचे काम चालू असून घटनास्थळावर पत्रकार कॉमेरामॕन आणि नागरीकांनी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आलय.