केशवनगर भागात विजेचा लपंडाव 

पाच दिवसापासून घंटा गाडी गायब 
 
s

पुणे - पुणे उपनगर मधील  केशवनगर ( मुंढवा ) भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या लपंडावामुळे  या भागातील नागरिक त्रस्त झाले असून, महावितरणच्या गचाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. 

सोमवारी सकाळी सात वाजता गेलेली वीज आकरा वाजता आली, त्यानंतर केवळ अर्ध्यातासानंतर पुन्हा जावून दीड वाजता आली, मंगळवारी सकाळी सात ते पावणेदहा पर्यंत वीज गायब होती, बुधवारी रात्री सात वाजल्यापासून १५ मिनिटाच्या अंतराने तीन वेळा वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच रात्री - बेरात्री वीज गुल होत असल्याने लोक हैराण झाले आहेत.

विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे.केशवनगर भागात एक दिवसाआड पाणी येते, पाणी येण्याच्या वेळेला वीज जात असल्याने लोकांचे हाल होत आहेत याबाबत  या परिसराचे नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत. 

पाच दिवसापासून घंटा गाडी गायब 

पवारवस्ती,  केशवनगर ( मुंढवा ) भागात मागील शनिवारपासून घंटा गाडी आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. प्रत्येक नागरिकांकडून दरमहा ६० रुपये जिजिया कर वसूल करणारी घंटा गाडी गायब झाल्यानेसंताप व्यक्त केला जात आहे. 

From Around the web