'फॅशनिस्टा मराठी'च्या सहसंपादकपदी अभिनेत्री रेखा मोरे

 
'फॅशनिस्टा मराठी'च्या सहसंपादकपदी अभिनेत्री रेखा मोरे


पुणे (विशेष प्रतिनिधी) -  लाइव्ह ग्रुपच्या फॅशनिस्टा मराठी या सर्वाधिक वाचले जाणार्‍या महिलांविषयक मराठी मॅगझिनच्या सहसंपादकपदी अभिनेत्री रेखा मोरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पुण्यातील फॅशनिस्टा कार्यालयात सूत्रे स्वीकारली.

फॅशनिस्टा मराठीने अवघ्या पाच महिन्यांत महिलांचे हृदय काबीज केले असून, तब्बल पाच लाख वाचकसंख्या प्राप्त केली आहे. फॅशन, सौंदर्य, आरोग्य, करिअर, चित्रपट, नातंगोतं, किचन, गृहसौंदर्यसारखे विषय हाताळत प्रत्येक अंकात महिलांसंबंधित वेगळे विषय पद्धतीने फॅशनिस्टा मांडत असते. फॅशनिस्टा मोबाइलवरही अगदी सहजगत्या वाचण्यासाठी उपलब्ध असून, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर जाऊन फॅशनिस्टा मराठी अ‍ॅप सर्च करून डाऊनलोड करायचे असते.

रेखा मोरे यांनी अभिमन्यू मुव्हिजच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. त्यांचा मन काहूर या अल्बम प्रक्षेकांना चांगलाच पसंद पडला होता. फॅशनिस्टा टीममध्ये त्यांच्या प्रवेशामुळे संपादकीय विभागात उत्साह आहे. फॅशनिस्टा आणि लाइव्ह ग्रुपच्या संचालिका इंजि. वर्षा मगाडे यांनी रेखा मोरे यांची नियुक्ती केली आहे.  

महिलांचा फॅशनिस्टा मंच लवकरच पुण्यात स्थापन होणार असून, त्याचे संचलन रेखा मोरे या करणार असल्याचे सांगण्यात आले.

फॅशनिस्टा मराठीचा ताजा अंक प्रसिद्ध... वाचण्यासाठी वेबसाईटला भेट द्या : 

www.fashionistamarathi.com

किंवा अ‍ॅपसाठी खालील लिंकवर क्लिक करा :

https://bit.ly/2xuESgc

'फॅशनिस्टा मराठी'च्या सहसंपादकपदी अभिनेत्री रेखा मोरे

From Around the web