पुणे – दसऱ्यानिमित्त लसीकरण मोहिमेला सुट्टी 

दसऱ्यानिमित्त लसीकरण मोहिमेला सुट्टी देण्यात आली
 
vaccine
- अजूनही पुरेशा सिरींज मिळत नाहीत

पुणे – दसऱ्यानिमित्त लसीकरण मोहिमेला सुट्टी देण्यात आली असून, शुक्रवारी लसीकरण होणार नसल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लसीकरण लस नसल्याने किंवा अन्य विविध कारणाने बऱ्याचदा खंडित झाली. मात्र, तरीही लसीकरण विभागाने चिकाटीने सुमारे 40 लाखांच्यावर लसीकरण केले आहे.

अद्याप सुमारे 17 ते 18 लाख नागरिकांचे लसीकरण राहिले असून त्यातील तीन लाख जणांचा पहिला डोस तर 15 लाख जणांचा दुसरा डोस राहिला आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर मध्ये पहिला डोसचा टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.

आधी पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्र यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र, आता पुन्हा एकदा वेगाने लसीकरण होईल, अशी प्रतिक्रिया महापालिका लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

अजूनही पुरेशा सिरींज मिळत नाहीत
राज्य सरकारकडून लसींचा साठा आल्यानंतर त्याबरोबर तेवढाच सिरींजचा पुरवठा अजूनही होत नाही. महापालिका सध्या स्वत: खरेदी केलेल्या सिरिंजचाच वापर करत आहे. त्यामुळे अजूनही राज्य सरकारकडून पुरेशा सिरींज येत नाहीत.

From Around the web