पुण्यात फायटोरेमेडिएशन प्रकल्पाची अंमलबजावणी

 


पिंपरी-चिंचवड परिसरातील हवामान सुधारण्यासाठी फिनोव्हेशनचा पुढाकार

पुण्यात फायटोरेमेडिएशन प्रकल्पाची अंमलबजावणीपुणे - सीएसआर डोमेनमधील प्रसिद्ध तांत्रिक संशोधन व सल्लागार एजन्सी इनोव्हेटिव्ह फायनान्शिअल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड (फिनोव्हेशन) यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात फायटोरेमेडिएशन सीएसआर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अग्रगण्य रॉक टूल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी- सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी हातमिळवणी केली आहे. २०२०  पर्यंत कार्बन फुटप्रिंट कमी करण्याच्या सँडविकच्या संकल्पाचा हा एक भाग आहे. सीएसआर उपक्रमाला समर्थन देताना फिनोव्हेशन तांत्रिक मदत प्रदान करेल आणि अकोल्यातील एनजीओ श्री दत्त ग्रामीण व शहरी विद्याप्रसारक मंडळ फायटोरेमेडिएशन-आधारित उपक्रमाची अंमबजावणी करण्यासाठी प्रत्यक्षपणे व्यवस्थापन करेल. 


पिंपरी-चिंचवड भागात २५,००० रोपे लावून वायू व पाणी दूषित होण्यावर उपाययोजना करण्याचा विचार संघटना करत आहेत.  या भागातील हरित क्षेत्र पुन्हा वाढत असताना हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. फायटोरेमेडिएशन प्रक्रियेसाठी स्थानिक वनस्पतींच्या मूळ प्रजातींचा वापर केला जाईल. त्याद्वारे या भागातील हवामान सुधारण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल. 


इनोव्हेटिव्ह फायनान्शिअल अॅडव्हाजर्स प्रायव्हेट लिमिटेड (फिनोव्हेशन) चे सीईओ डॉ. सौमित्रो चक्रवर्ती म्हणाले की, “संभाव्य कृती पद्धतशीर व वैज्ञानिक असेल तेव्हाच सकारात्मक कृती केल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात. पर्यावरणावर मानवाचे नुकसान व्यापक प्रमाणावर कमी करण्याच्या आमच्या बांधिलकीचा विस्तार करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत.”


फायटोरेमेडिएशन ही पर्यावरणास अनुकूल पद्धत असून ती वनस्पती व संबंधित सूक्ष्मजीव वापरून वातावरणातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, विषाक्त पदार्थाचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा ते वेगळे करण्यासाठी वापरली जाते. लागवड केलेली झाडे मातीत अस्तित्वात असलेल्या जड धातूंचे दूषित पदार्थ शोषून घेतील तसेच त्यातील निकृष्टता कमी करून जमिनीची स्थिती सुधारेल. याद्वारे पाण्याची गुणवत्ताही नियंत्रित केली जाईल. लागवड केलेली झाडे कार्बन सिंक तयार करतील. त्यामुळे ग्रीनहाऊस वायूचे उत्सर्जन कमी होईल आणि या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारेल.

From Around the web