स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके - ऍड. रशिदा सिद्धीकी ( Video)

 
स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके - ऍड. रशिदा सिद्धीकी ( Video)


पुणे -  स्त्री ही शक्तीचे प्रतीक आहे. तिच्याशिवाय संसार चालू शकत नाही. स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके आहेत, पैकी एक चाक निखळून पडले तर संसारचा गाडा पुढे चालू शकत नाही, कायद्याने तिला समान  अधिकार दिले आहेत, पण समाज काय म्हणेल ? या भीतीपोटी ती पुढे येत नाही, अशी खंत पुण्याच्या प्रसिद्ध वकील ऍड. रशिदा सिद्धीकी यांनी व्यक्त केली.

पुणे लाइव्हच्या वतीने खास महिलांसाठी दर आठवड्याला ऑनलाईन चर्चासत्र आणि वाचक संवाद आयोजित केला जातो. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात ऍड. रशिदा सिद्धीकी यांनी मार्गदर्शन केले, त्यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला पुणे लाइव्हच्या सहसंपादक रेखा मोरे यांनी प्रास्ताविक केले.

ऍड. रशिदा सिद्दीकी म्हणाल्या की, महिलांनी पतीचा अन्याय  सहन न करू नये. कायदेशीर मार्गाने लढा द्यावा. तिला पतीच्या संपत्तीमध्ये निम्मा वाटा मिळू शकतो. तसेच वडिलांच्या संपत्तीमध्येही समान हिस्सा मिळू  शकतो.

या चर्चासत्रमध्ये राष्ट्रवादीच्या पुणे शहर सरचिटणीस अर्चना चंदनशिवे, गुह सजावट मार्गदर्शक रेखा एकबोटे, श्रेया एकबोटे, सामाजिक कार्यकर्त्या कालिंदी पाटील आदी सहभागी झाल्या होत्या.

Video
From Around the web