pune train update  - मुंबई सिंहगड एक्सप्रेस पुन्हा 18 ऑक्‍टोबरपासून धावणार

पुणे-मुंबई-पुणेदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार
 
sinhgad train
सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी एक्‍स्प्रेस सुटणार असून, रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचणार
पुणे – करोनामुळे मागील वर्षी स्थगित केलेली पुणे-मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेस 18 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई-पुणेदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

करोनामुळे मार्च महिन्यात रेल्वेने नियमित सेवा स्थगित केली होती. टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवरील सेवा सुरू झाल्या. मात्र, सिंहगड एक्‍स्प्रेस यार्डातच होती. अखेरीस पुढील आठवड्यात एक्‍स्प्रेस धावणार आहे. 18 ऑक्‍टोबरपासून पुण्याहून रोज सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी रेल्वे सुटणार असून, 9 वाजून 55 मिनिटांनी सीएसएमटी (मुंबई) येथे पोहोचणार आहे.

तर सीएसएमटी येथून सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी एक्‍स्प्रेस सुटणार असून, रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे. ही रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड, पिंपरी, खडकी आणि शिवाजीनगर येथे थांबणार आहे.

From Around the web