पुणे : चोरट्याना पाहून धूम ठोकणारे दोन पोलीस निलंबित 

 
पुणे : चोरट्याना पाहून धूम ठोकणारे दोन पोलीस निलंबित

पुणे - चोरट्यांना घाबरून धूम ठोकणाऱ्या दोन पोलिसांना पोलीस उप आयुक्तांनी  तडकाफडकी  निलंबित केले आहे.  पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि अनिल दत्तू अवघडे अशी या निलंबित पोलिसांची नावे आहेत. 

औन्ध भागातील शैलेश टॉवर मध्ये सोमवारी पहाटे ३  वाजण्याच्या सुमारास चार चोरटे चोरी करीत असताना स्थानिक रहिवाश्यांनी पोलिसांना माहिती दिली असता, पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि अनिल दत्तू अवघडे  हे मोटार सायकलवरून घटनास्थळी आले पण चोरट्यांना अटक करण्याऐवजी चोरट्यांना घाबरून ते पळून गेले होते. विशेष म्हणजे अनिल दत्तू अवघडे यांच्याकडे रायफल असतानाही त्यांनी चोरांना पकडण्याचे धाडस न करता धूम ठोकली होती. 

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. पुणे लाइव्हने सीसीटीव्ही फुटेजसह  हे वृत्त प्रकाशित केले होते. अखेर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी प्रवीण रमेश गोरे आणि अनिल दत्तू अवघडे यांना  तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलीस खात्याची प्रतिमा या घटनेमुळे मलीन झाली असून, या कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

यापूर्वीचे वृत्त वाचा 

आता बोला ! पुण्यातील औंध भागात चोरट्यांना बघून पोलीस पळाले ...

From Around the web