पालिकेच्या असहकार्यामुळे सामाजिक कार्यकर्ते,रुग्णांना अडचण

 
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन जाधव यांची व्यथा
 
पालिकेच्या असहकार्यामुळे सामाजिक कार्यकर्ते,रुग्णांना अडचण


पुणे: संशयित कोविड रुग्णाच्या तपासणीपासून ,रुग्णवाहिका मिळणे ,अहवाल मिळणे ,रुग्णालय मिळणे अशा सर्व बाबतीत पुणे महापालिका यंत्रणेकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते   आणि प्रत्यक्ष रुग्ण यांना प्रचंड अडचणी येत असून मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची व्यथा  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव  नितीन उर्फ बबलू जाधव यांनी व्यक्त केली आहे. पालिकेच्या कारभारामुळे स्वाब टेस्टिंग साठी पुढे येत नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. 

मार्च पासून नितीन जाधव हे कोरोना साठीमध्ये मध्यवर्ती पेठा आणि शहरातील रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. या अनुभवातून आज त्यांनी पत्रकाद्वारे काही प्रश्न उपस्थित केले .

पालिकेच्या डॅशबोर्ड वर रुग्णांसाठी जागा शिल्लक नाही असे सांगितले जात असताना प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यावर मात्र जागा मिळते ,रुग्ण वाहिका १०८ वरून बोलावली तर दिवसभर ती उपलब्ध होत नाही. रुग्णांच्या तपासणीसाठी ८ -८ तास थांबावे लागते ,आणि एका ठिकाणी निगेटिव्ह आलेला रुग्णाचा अहवाल दुसऱ्या ठिकाणी पॉझीटिव्ह ठरतो ,अशा अनेक व्यथा आणि अडचणी नितीन जाधव यांनी आज पत्रकाद्वारे कळविल्या आहेत .

रुग्णांच्या मदतीसाठी पालिकेची यंत्रणा सहकार्य करीत नसल्याने रुग्णांना आणि त्याना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे ,असे नितीन जाधव यांनी सांगितले .पालिकेचे अधिकारी कार्यकर्त्यांना नीट उत्तरे देत नाहीत. त्यामानाने विभागीय आयुक्त मदत करायला उपलब्ध राहत असल्याची भावना नितीन जाधव यांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे रुग्ण जेजुरीला पाठवायची वेळ का येते ? डॅशबोर्ड हेल्पलाईन वर संपर्क साधून काहीही उपयोग होत नसल्याचा अनुभव  जाधव यांनी सांगितले आहे . 

केवळ सी -व्हिटॅमिन ,क्रोसीन गोळ्या ,झोप येत नसल्यास एखादी गोळी आणि चांगले भोजन देणे एव्हडीच उपाय योजना असेल तर ती रुग्णांना घरीच उपलब्ध करून द्यावी ,असे आवाहन जाधव यांनी केले आहे . खासगी रुग्णालयांच्या आहारी न जा पालिकेने आर -७ अन्वये ताब्यात घेतलेल्या मालमत्ता ,सभागृहे येथे रुग्णांची व्यवस्था करावी .दिल्लीला १० हजार रुग्णांचे कोविड रुग्णालय उभारायला जमते ,ते पुणे पालिकेला का जमू नये ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे . सिंहगड रस्त्यावर डॉक्टर एका ठिकाणी बसून रुग्णांना मजले उतरवून खाली येण्यास भाग पाडतात .

 

From Around the web