पुणे उपनगर मध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

 
पुणे उपनगर मध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा


मुंढवा- पुणे उपनगर मध्ये असलेल्या केशवनगर - मुंढवा मध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. भाजी मार्केट मध्ये लोक गर्दी करीत असल्याचे दिसून येत असून यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


 पुणे शहरात कोरोना अवाक्याबाहेर जात आहे. त्यात केशवनगर व मुंढवा परिसरात कोरोनाचे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित ७२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे.


 केशवनगरमध्ये ५९ रुग्ण कोरोनाबाधित झाले होते. त्यातील ३६ रुग्ण बरे झाले. यात दोन जणांचा बळी गेला आहे. २१ बाधितांवर उपचार सुरू आहे. मुंढवा भागात १३ जण बाधित झाले होते त्यातील ८ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पाच जणांवर उपचार सुरू आहे. मुंढव्यात सुदैवाने कोणाचाही बळी गेला नाही.


शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे मात्र, परिसरातील नागरिक सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. केशवनगर-मुंढव्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे, परंतु, तरीदेखील नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. सामाजिक अंतर व मास्क वापराच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून व व्यावसायिकांकडून केले जात आहे. परिसरात गरज नसतांना रस्त्यावर उतरणाऱ्यांची जास्त संख्या दिसून येत आहे.

भाजी खरेदी, किराणा मालाच्या दुकानांसमोर नागरिकांची गर्दी दिसून येते तेथे सामाजिक अंतर पाळले जात नाही. तरूण चौकात गप्पा मारणे, विनाकारण बाजारात गर्दी करतांना दिसतात. या भागात मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येतांना दिसतात. त्यांची तपासणी मात्र होत नाही. त्यामुळे त्यांची रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसते.

बेजबाबदार नागरिक व व्यावसायिकांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.

From Around the web