राजगृह तोडफोडीचा लोकजनशक्ती पार्टी कडून निषेध

 
 राजगृह तोडफोडीचा लोकजनशक्ती पार्टी कडून निषेधपुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर  तोडफोडीचा रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीकडून निषेध करण्यात आला आहे.

 पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब कांबळे, प्रवक्ते के सी पवार, रमेश शेळके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. या वास्तूचे पावित्र्य जपले जावे,  आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी लोक जन शक्ती कडून करण्यात येत आहे.

From Around the web