आता बोला !  पुण्यातील औंध भागात चोरट्यांना बघून पोलीस पळाले ... 

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ... 

 
आता बोला !  पुण्यातील औंध भागात चोरट्यांना बघून पोलीस पळाले ...
पोलीस आयुक्त भित्र्या पोलिसांवर कोणती कारवाई करणार ? 

पुणे : आजवर पोलिसांना बघून चोरटे पळून गेल्याचं ऐकलं होतं.पण पुण्यातील औंध भागामध्ये सिद्धार्थ नगर मध्ये चोरट्यांना बघून पोलीस पळून गेल्याचं  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान या घटनेची पोलीस आयुक्तांनी दखल घेतली असून, भित्र्या पोलिसांवर काय कारवाई होणार ? याकडं लक्ष लागलं आहे. 


घडलं असं की , पुण्यातील औंध भागातील सिद्धार्थनगरमध्ये  शैलेश टॉवर सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये २८ डिसेंबर २०२० च्या  मध्यरात्री तीनच्या सुमारास चार चोरटे घुसले, तेथील वॉचमनला दोन जणांनी चाकू दाखवला व पकडून ठेवले व दोन जणांनी वरती जाऊन कटरच्या सहाय्यने एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. 

आवाज आल्यामुळे आजूबाजूंच्या लोकांना चोर आल्याचे लक्षात आल्यामुळे सोसायटी मधील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन केला, थोड्याच वेळात पोलीस बाईकवरून हजरही झाले. त्यांनी चोरांना आलेलं बघितलंही  पण पोलिसांनी स्वतःकडे बंदूक असतांनाही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलिसच पळून गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. 

 बंद असणाऱ्या फ्लॅटचे कुलूप चोरटयांनी यशस्वीरित्या तोडले व एका फ्लॅटचे कुलूप तोडत असताना लोकांचा आवाज ऐकून चोरटे पळू लागले पाचव्या घराचे कुलूप तोडण्यात त्यांना अपयश आले पण सुदैवाने बंद फ्लॅट मध्ये कोणीही राहत नसल्याने त्यांच्या हाती फारस जास्त काही आले नाही. चोरट्यांनी जाता - जाता फक्त एका घरातील LCD TV चोरून नेला.   

पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, स्वतः कडे बंदूक असूनही एक पोलीस बाईकवरून पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे, त्यांच्यानंतर चोरटे पळाले, पोलिसांकडे Wireless Phone देखील होते त्यांनी जर ठरवल असत तर  पुढे मेसेज पाठवून चोरट्यांना तात्काळ पकडू शकले असते. पण या घटनेत पोलिसांकडून तसे काहीही झालेले दिसले नाही.गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नसल्यामुळे देखील पुणे शहरात घरफोड्या व गुन्हेगारी वाढत आहेत. 

या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात स्थानिक लोकांनी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या दोघांचा चौकशीचे आदेश दिले आणि या दोघांचाही अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. मात्र या दोघांवर आता काय कारवाई याकडे लक्ष वेधलं आहे. 

CCTV 

From Around the web