'एआयसीटीई-सीआयआय' सर्वेक्षणात 'सूर्यदत्ता'ला सलग सहाव्यांदा 'प्लॅटिनम' मानांकन

 
'एआयसीटीई-सीआयआय' सर्वेक्षणात 'सूर्यदत्ता'ला सलग सहाव्यांदा 'प्लॅटिनम' मानांकन

पुणे : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात टॉप इंडस्ट्री-लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एसआयबीएमटी) या दोन महाविद्यालयांना प्लॅटिनम कॅटेगरीत स्थान मिळाले असून, भारतातील टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये येण्याचा बहुमान सूर्यदत्ता संस्थेला मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल सीआयआय एजुकेशन समिटमध्ये सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाला. 'एसआयएमएमसी'ला सलग सहाव्या वर्षी प्लॅटिनम श्रेणीमध्ये येण्याचा बहुमान मिळाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी अशा संस्थांसमवेत सूर्यदत्ताला हा बहुमान मिळाला आहे.

औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांतील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने एआयसीटीई आणि सीआयआय यांनी संयुक्तपणे २०१२ पासून हे सर्वेक्षण सुरु केले आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण आणि आर्किटेक्चर या विद्याशाखांचा सर्वेक्षणात समावेश आहे. या सर्व्हेक्षणात तांत्रिक संस्था उद्योगांशी जोडल्या गेल्या असून, गेल्या नऊ वर्षांपासून 'सीआयआय'ने 'एआयसीटीई'च्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरु ठेवले आहे. मूल्यांकन मापदंडांमध्ये गव्हर्नन्स (१०%), अभ्यासक्रम (२०%), प्राध्यापक वर्ग (२०%), पायाभूत सुविधा (१०%), सेवा / प्रकल्प व कौशल्य विकास (२०%) आणि प्लेसमेंट (१०%) यांचा समावेश आहे. एकूण ८१४ शिक्षण संस्थांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. त्यात १८४ इन्स्टिट्यूट प्लॅटिनम कॅटेगरीत आल्या. उद्योगांना पूरक अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि उपक्रम, बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रतिभा निर्मिती, अभ्यासक्रमाची रचना करताना उद्योग जगताचा सहभाग, उद्योगांना अभ्यास भेटी, प्रत्यक्ष प्रशिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रकल्प, उद्योगभिमुख प्रकल्प आणि कौशल्ये प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्लेसमेंट, रोजगार संधी, स्टार्टअप्स अशा अनेक मुद्द्यांवर आधारित असे हे सर्वेक्षण होते.

या मानांकनाबद्दल आनंद व्यक्त करून 'एसआयएमएमसी'चे संचालक आणि 'सूर्यदत्ता'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "संस्थेच्या 'एसआयएमएमसी'ला सलग सहाव्यांदा आणि 'एसआयबीएमटी'ला प्रथमच प्लॅटिनम प्रकारात स्थान मिळाले, हे अभिमानास्पद आहे. हे यश सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहयोगी सभासद, संस्था, प्लेसमेंट देणाऱ्या कंपन्या यांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाले. सूर्यदत्ता संस्था जगातील सर्वोकृष्ट संस्था बनवण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि उच्च गुणवत्तेच्या संशोधनाची नेमणूकी केली असून, आम्ही व्यवस्थापन-विकास कार्यक्रम, कन्सल्टन्सी, अप्लाइड रिसर्च, इंटर्नशिप टेंअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आदी उपक्रमही राबवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते."

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (सीएमएमसी) ही भारतातील अशा काही मोजक्या संस्थांपैकी एक आहे ज्यांना सलग सहा वर्षे प्लॅटिनम प्रकारात स्थान देण्यात आले आहे. हे यश सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या सक्रिय पाठिंबा सहभागामुळे शक्य झाले. सूर्यदत्ता संस्था जगातील सर्वोकृष्ट संस्था बनवण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि उच्च गुणवत्तेच्या संशोधनाची नेमणूकी केली असून, आम्ही व्यवस्थापन-विकास कार्यक्रम, कन्सल्टन्सी, अप्लाइड रिसर्च, इंटर्नशिप टेंअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आदी उपक्रमही राबवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असे डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न 'एसआयएमएमसी' हे 'एआयसीटीई', महाराष्ट्र राज्य व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय मान्यताप्राप्त आणि 'नॅक'द्वारा अधिस्वीकृती असलेले महाविद्यालय आहे. शिक्षणासोबतच सूर्यदत्तामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार इतर क्षेत्रात त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या व्यावसायिक आणि व्यक्तिगत विकासाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची जडणघडण उत्तम होते. विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे नियमित आयोजिली जातात. विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने आजवर जवळपास ३०० हुन अधिक पद्म आणि नोबेल विजेत्यांना सूर्यदत्ताने सन्मानित केले आहे," असेही डॉ. चोरडिया यांनी नमूद केले. 

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे

  • पूर्ण सर्वेक्षणासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या संस्थांची संख्या : ४४८६
  • पूर्ण सर्वेक्षणात सहभागी झालेल्या संस्थांची संख्या : ८१४
  • प्लॅटिनमची मिळालेल्या संस्थांची संख्या : १८४
  • प्लॅटिनममध्ये महाराष्ट्रातील संस्था : ५३
  • गोल्ड श्रेणी मध्ये : २४६
  • सिल्व्हर श्रेणी मध्ये : ३८४

From Around the web