पुण्यात तुमचे नगरसेवक दहा आणि बाता आवाक्याबाहेरच्या ...

पुणे - पुण्याचा पुढचा महापौर शिवसेनेचा असेल असा दावा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार टोला लगावला आहे. पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा ! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी ! असे मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय गणित बदललेली असतील, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न करू. पुढचा महापौर आमचाच असेल. असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.
त्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी !महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा ! तरीही आपल्याला शुभेच्छा !
अहो @rautsanjay61 जी,
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2021
पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी !
महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा !
तरीही आपल्याला शुभेच्छा ! pic.twitter.com/iCK2IlO4NB