'सूर्यदत्ता'मधील महिलांनी घेतला संगीतखुर्चीचा आनंद

पुणे: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये 'वुमेन्स मंथ' साजरा केला जात आहे. आरोग्य, संरक्षण, सामाजिक संस्था, बँक, सरकारी कार्यालये अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांकडून प्रेरणादायी व्याख्याने, तसेच विविध स्पर्धां घेण्यात येत आहेत. 'सूर्यदत्ता'मधील शिक्षक, शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच संगीतखुर्ची स्पर्धा आयोजिली होती. बऱ्याच कालावधीनंतर संगीत खुर्ची खेळल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या स्पर्धेमध्ये जिंकलेल्यांना पारितोषिक देण्यात आले.
सूर्यदत्ता संस्था 'स्त्री-शक्ती पुरस्कार' आणि 'सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार' याच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाची ओळख पटवून देण्याचे, स्त्रियांच्या समानतेबद्दल जागरूकता वाढवण्याचे काम करत आहे. सुर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत नेहमीच स्त्रियांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांच्या सन्मान आणि सहाय्य केले जाते. केवळ एक दिवस महिला दिन साजरा न करता महिलांच्या विषयी रोजच सन्मान बाळगला जावा, या उद्देशाने सूर्यदत्ताने पुढाकार घेत महिनाभर विविध उपक्रम घेण्याचे ठरवले आहे, असे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.