'अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल ' येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन

 
'अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल ' येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन

पुणे : आझम कॅम्पस मधील अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अॅड ज्युनियर कॉलेज येथे उत्साहपूर्वक वातावरणात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून लेखक, प्राध्यापक डॉ. नंदकुमार शिंदे (विभाग प्रमुख, इंग्रजी भाषा, सिंबायोसिस कॉलेज, पुणे) हे उपस्थित होते .मराठी भाषेला जागतिक भाषा करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

 या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. परवीन शेख यांनी प्रमुख मान्यवरांचे  स्वागत केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अताउल्लाह शेख व शिक्षिका बिल्किस शेख यांनी केले. सुत्रसंचालन  नितीन तोडकर , रईसा सुंडके यांनी केले.

 इम्रान झारेकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.हा संपूर्ण कार्यक्रम झूम ऑनलाईन याद्वारे घेण्यात आला. आस्मा शेख , सौ. यमीन शेख व तवक्कल  यांनी विशेष परिश्रम घेतले.
 

From Around the web